Day 212 - ईश्वरास ..
कधी पंतंग होऊन वार्यावर झुलताना
कधी नीलनभावर विहंगासम फिरताना
तू डुलवशील जणू बाळ असे मी तान्हा
हळूवार असे तो झोका सावरताना
आच्छादीत जाशी आसमंत तव मायेचा
पसरला लांबवर गालीच्याच पाचूंचा
तू दिसशी सर्वदूर अब्ज अब्ज बाहूंचा
मी उभा इथे हा माथा की स्वर्गाचा
हलक्याहून हलके तनमन आज जहाले
कधी उठले होते प्रश्न तेही निमाले
काजळ काळे डाग दूर दूर गेले
नी तुझेच ते रुप जवळी
लेखन- नरेंद्र प्रभू
Shubhratri!

